71 वा प्रजासत्ताक दिन व सैन्य प्रशिक्षण दिन उत्साहात साजरा

म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली, मुळशी येथे भारताचा 71 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला ,सकाळी प्रमुख अतिथी एअर कमोडोर घार सिंग (प्रिंसिपल डायरेक्टर ट्रेनिंग, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले ,या नंतर 5 वी ते 12 वी चे शानदार संचलन झाले ,याच कार्यक्रमात शाळेची सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी स्कूल कॅप्टन श्वेता पाटील हिचा मानाची तलवार देऊन सन्मान करण्यात आला यानंतर इयत्ता बारावीची पासिंग आऊट परेड झाली यात शाळेत इ.पाचवी ते बारावी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देण्यात आले ,यानंतर विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली यात डंबेल्स ,मास पी .टी, पिरॅमिड्स ,लेझीम ,आर्चरी ,हॉर्स रायडिंग ,रोप मल्लखांब, व्हर्टीकल रोप क्लायबिंग व कराटे या यांचा समावेश होता आर्चरी ,रायफल शूटिंग ,हॉर्स रायडिंग व कराटे यांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी सर्व मान्यवर अतिथी ,पालक व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले .याप्रसंगी राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या खेळाडूंचा व आंतरकुल क्रीडा स्पर्धेत विजयी दुर्गावती संघाचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला,अतिथी मनोगतात एअर कमोडोर श्री.घार सिंग यांनी सांगितले की या शाळेतील मुली नक्कीच देशाच्या सरंक्षण दलात सक्षम अधिकारी म्हणून काम करतील असा विश्वास वाटतो, या कार्यक्रमाला सिनेमा दिग्दर्शक पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री.राम गोपाल बजाज, अभिनेते श्री.रिजूजी बजाज, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. लीना कळमकर , शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष सौ.स्वाती काटे ,शाळेच्या प्राचार्या डॉ.सुलभा विधाते ,शाळेचे कमांडंट ग्रुप कॅप्टन (निवृत्त) श्री विजय कुलकर्णी ,उपमुख्याध्यापक श्री अनंत कुलकर्णी ,पर्यवेक्षक श्री श्याम नांगरे, पर्यवेक्षक श्री संदीप पवार , सर्व पालक ,कासार आंबोली ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सुलभा विधाते यांनी केले तर आभार कमांडंट ग्रुप कॅप्टन (निवृत्त) श्री विजय कुलकर्णी यांनी मानले , अतिथी परिचय सौ.सावित्री पाटील यांनी करुन दिला सूत्रसंचालन श्री.महेश कोतकर , व विद्यार्थिनींनी केले या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सैन्य प्रशिक्षक आॅनररी कॅप्टन श्री. चंद्रकांत बनसोडे, शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख व पर्यवेक्षक श्री संदीप पवार यांनी कामकाज पाहिले ,कार्यक्रमाचे नियोजन सर्व क्रीडा प्रशिक्षक , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *