स्वातंत्र दिन सैनिकी प्रशालेत उत्साहात साजरा….

म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली मुळशी येथे ७३ वा स्वातंत्र दिन समारंभ उत्साहात पार पडला. प्रमुख अतिथी विंग कमांडर अनुपमा मोंगा यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन झाले. त्यानंतर भर पावसात इयत्ता ५ वी ते १२ वी च्या विद्यर्थिनींनी शानदार संचलनाने प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. याप्रसंगी प्रशालेच्या शालासमिती अध्यक्षा डॉ. माधवी मेहंदळे, सौ.माधवी देशपांडे, सौ. संध्या टाकसाळे, प्रशालेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, श्री. संदीप पवार, शिक्षकवृंद आणि सैनिकी परिवारातील सर्व सदस्य व पालक उपस्थित होते. या प्रसंगी आपल्या मनोगतात विंग कमांडर अनुपमा मोंगा यांनी सांगितले की आज सर्वच क्षेत्रात महिला सक्षमपणे दमदार पाऊल पुढे टाकत आहेत तसेच आज या शाळेतील इयत्ता ५ वी ते १२ वी च्या कॅडेट्सनी भर पावसात केलेले शानदार संचलन पाहून देश सुरक्षित हातांमध्ये असल्याची खात्री आहे तसेच या शाळेतील अधिकाधिक मुली सैन्यदलात अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडतील असा विश्वास व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणात डॉ.माधवी मेहंदळे यांनी सांगितले की अश्या शारीरिक व मानसिक क्षमता असण्याऱ्या कणखर मुली घडविण्याचे काम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा करीत आहे याचा सार्थ अभिमान आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत असताना प्रशालेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी सांगितले की १६० वर्षांची परंपरा असलेल्या म. ए. सो या संस्थेच्या या सैनिकी शाळेत सैनिकी प्रशिक्षणाबरोबरच राष्ट्रप्रेमाचे संस्कार ही केले जात असून सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनी आज सैन्यदलाबरोबरच इतर ही क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवित आहेत. पाहुण्यांचा परिचय उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अद्वैत जगधने यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन क्रीडा विभाग प्रमुख श्री. संदीप पवार, ऑनररी कॅप्टन चंद्रकांत बनसोडे, सुभेदार आर. तिवारी, श्री. गजानन माळी व सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *