हरित शिष्यवृत्ती व पुरस्कार वितरण समारंभ २०१७-१८ सैनिकी प्रशालेत संपन्न……..

बुधवार दि. २७ जून २०१८ रोजी दु. ४.०० वा. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी प्रशालेमध्ये हरित शिष्यवृत्ती व पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी पर्सिस्टंट फौन्डेशनच्या श्रीमती सोनाली देशपांडे, श्रीमती अनया नेतानराव व शाला समिती महामात्रा डॉ. मानसी भाटे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

हरित शिष्यवृत्ती व पुरस्कार वितरणाचे प्रशालेचे हे ९ वे वर्ष आहे. सैन्यप्रशिक्षणाबरोबर हरित प्रकल्प हा प्रशालेचा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे. सदर उपक्रमामध्ये प्रशालेतील घन कचरा व्यवस्थापन, गांडूळ खत, भाजीपाला लागवड व एक मुल एक झाड इ. विविध गोष्टी मुली करतात. शाळा निवासी असल्याने कचऱ्याची समस्या प्रशालेताही आहे. यामध्ये वसतीगृह, भोजनालय व प्रशाला या तीनही ठिकाणी कचरा निर्माण होतो. कचरा प्रशालेच्या बाहेर न जाऊ देता विद्यार्थिनी प्रशाला परिसरातच गांडूळ खत व कॉम्पोस्टिंग च्या माध्यमातून परिसरातच जिरवतात. प्लास्टिक तसेच ओला व सुका कचरा वेगळा करून त्या त्या ठिकाणी त्याची विल्हेवाट केली जाते.

या व्यतिरिक्त मुलींमध्ये पर्यावरण विषयक जाणीव जागृती होण्यासाठी विविध उपक्रम,कार्यशाळा, तज्ञांचे मार्गदर्शन असे वर्षभर नियोजन केले जाते. यातूनच मुलींवर हरित संस्कार केला जातो. हरित शिष्यवृती व पुरस्कार प्राप्त होण्यासाठी विद्यार्थिनीचा वर्षभर या उपक्रमांमध्ये सक्रिया सहभाग व त्याच्या नोंदी ठेवाव्या लागतात. त्यानंतर विद्यार्थिनींची लेखी परीक्षा, तज्ञांमार्फत मुलाखती घेतल्या जातात. सर्वोत्तम काम करणाऱ्या विद्यार्थिनीनाच हरित शिष्यवृती व पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चे हरित शिष्यवृत्ती ५ विद्यार्थिनींना देण्यात आली.

क्रमांक विद्यार्थिनींचे नाव वर्ग रक्कम
सृष्टी प्रमोद कारखानीस ६ अ २५०००
वैभवी दिलीप  जाधव ११ ब २००००
सृष्टी बालाजी रायबन ७ ब १५०००
सृष्टी परमेश्वर बोऱ्हाडे ६ अ १००००
पायल धनंजय जासूद ७ ब ५०००

त्याचप्रमाणे
हरित पुरस्कार रु. २००० प्रत्येकी, पुढील ९ विद्यार्थीनीना प्रदान करण्यात आली.

क्रमांक विद्यार्थिनींचे नाव वर्ग रक्कम
पायल मांडेकर ७ ब २०००
सई मिलिंद खानविलकर ७ ब २०००
वैष्णवी कवडे ११ ब २०००
साक्षी सुखदेव शिरसकर १० अ २०००
जागृती जयसिंग खुंटे १० ब २०००
ऐश्वर्या अनिल राऊत ५ ब २०००
वेदश्री वसंत बाबर ५ अ २०००
राधिका पोपटराव चांदगुडे ८ अ २०००
पलक किरण मिठारी ८ ब २०००

सर्व शिष्यवृती व पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनींचे मान्यवर व  सैनिकी परिवाराने कौतुक केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पर्यावरण विभाग प्रमुख श्री. श्याम नांगरे व पर्यावरण विभाग सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *