सैनिकी शाळेत गणेशोत्सव उत्साहात साजरा..

सालाबाद प्रमाणे यंदाही दि. २ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर २०१९ रोजी राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेमध्ये गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. इयत्ता दहावी अ व ब मधील विद्यार्थिनींनी गणेशोत्सवाचे पूर्ण नियोजन केले. सदर कार्यक्रमांमध्ये धार्मिक विधी बरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम, आगमनाची मिरवणूक, विसर्जनाची मिरवणूक आणि शिक्षक व इतर सर्वांचा सहभाग त्यामध्ये घेण्यात आला. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सकाळी साडेसात वाजता गणेश मिरवणूक काढण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांच्या ढोल पथकाने नाद पूर्ण वादन करून, भक्तिमय वातावरणामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळची आरती मा. मुख्याध्यापिका डॉ. सौ सुलभा विधाते व मा. नितीन विधाते यांच्या हस्ते करण्यात आली. संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यामध्ये १० वीच्या विद्यार्थिनींनी इयत्तानुसार इतर मुलींच्या खेळाचे आयोजन केले होते. याप्रसंगी शिक्षक व मेट्रन यांचे देखील खेळ घेण्यात आले. या गणेशोत्सवाचा एक बिंदू असणारा मुलींचा नृत्यप्रकार दहावी अ व दहावी ब च्या मुलींनी सादर केला. दिनांक 3 रोजी सकाळी पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष काटे मॅडम व इतर सदस्य यांनी श्री. गणेशाची आरती केली यानंतर पालक शिक्षक संघाच्या वतीने सर्व विद्यार्थिनींना प्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळी नऊ ते दहा या वेळात गणेशाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली व या विसर्जन मिरवणूक नंतर गणेशोत्सवाची सांगता झाली. शाळेतील दीड दिवसांचा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. सदर उत्सवाचा देखावा करताना विद्यार्थिनींनी काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार केला होता डॉक्टर अब्दुल कलाम यांचे स्वप्न व्हिजन ट्वेंटी-ट्वेंटी यावर आधारित देखावा साजरा करण्यात आला होता यामध्ये प्रगतीचे रूप असणारी पुणे मेट्रो त्याचबरोबर इस्रोचे चांद्रयान 2, चांद्रयान-1, इतर मोहिमा आणि अद्ययावत असणारे आधुनिक शहर ही संकल्पना साकार करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रयत्नांमधून शाडूच्या मातीपासून मेट्राच्या कॅप्टनच्या वेषातील मंगलमुर्ती स्वतः तयार केली होती. संपूर्णपणे गणपतीची मूर्ती इको फ्रेंडली करण्याचा मुलींचा आटोकाट प्रयत्न होता. सदर कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या डॉक्टर सौ सुलभा विधाते मॅडम,शाळेचे उपमुख्याध्यापक श्री कुलकर्णी सर, पर्यवेक्षक श्री नांगरे सर व श्री पवार सर यांच्याबरोबरच शाळेतील इतर शिक्षक वृंद यांनी याकामी महत्त्वाचे व मोलाचे सहकार्य केले. इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री अद्वैत जगधने व रेखा रायपूरकर यांनी या सर्व कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन व नियोजन केले होते. सालाबाद प्रमाणे यंदाही दि. २ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर २०१९ रोजी राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेमध्ये गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. इयत्ता दहावी अ व ब मधील विद्यार्थिनींनी गणेशोत्सवाचे पूर्ण नियोजन केले . सदर कार्यक्रमांमध्ये धार्मिक विधी बरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम, आगमनाची मिरवणूक ,विसर्जनाची मिरवणूक आणि शिक्षक व इतर सर्वांचा सहभाग त्यामध्ये घेण्यात आला. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सकाळी साडेसात वाजता गणेश मिरवणूक काढण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांच्या ढोल पथकाने नाद पूर्ण वादन करून, भक्तिमय वातावरणामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळची आरती मा. मुख्याध्यापिका डॉ. सौ सुलभा विधाते व मा. नितीन विधाते यांच्या हस्ते करण्यात आली. संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यामध्ये १० वीच्या विद्यार्थिनींनी इयत्तानुसार इतर मुलींच्या खेळाचे आयोजन केले होते. याप्रसंगी शिक्षक व मेट्रन यांचे देखील खेळ घेण्यात आले. या गणेशोत्सवाचा एक बिंदू असणारा मुलींचा नृत्यप्रकार दहावी अ व दहावी ब च्या मुलींनी सादर केला. दिनांक 3 रोजी सकाळी पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष काटे मॅडम व इतर सदस्य यांनी श्री. गणेशाची आरती केली यानंतर पालक शिक्षक संघाच्या वतीने सर्व विद्यार्थिनींना प्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळी नऊ ते दहा या वेळात गणेशाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली व या विसर्जन मिरवणूक नंतर गणेशोत्सवाची सांगता झाली. शाळेतील दीड दिवसांचा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. सदर उत्सवाचा देखावा करताना विद्यार्थिनींनी काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार केला होता डॉक्टर अब्दुल कलाम यांचे स्वप्न व्हिजन ट्वेंटी-ट्वेंटी यावर आधारित देखावा साजरा करण्यात आला होता यामध्ये प्रगतीचे रूप असणारी पुणे मेट्रो त्याचबरोबर इस्रोचे चांद्रयान 2, चांद्रयान-1, इतर मोहिमा आणि अद्ययावत असणारे आधुनिक शहर ही संकल्पना साकार करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रयत्नांमधून शाडूच्या मातीपासून मेट्राच्या कॅप्टनच्या वेषातील मंगलमुर्ती स्वतः तयार केली होती. संपूर्णपणे गणपतीची मूर्ती इको फ्रेंडली करण्याचा मुलींचा आटोकाट प्रयत्न होता. सदर कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या डॉक्टर सौ सुलभा विधाते मॅडम,शाळेचे उपमुख्याध्यापक श्री कुलकर्णी सर,पर्यवेक्षक श्री नांगरे सर व श्री पवार सर यांच्याबरोबरच शाळेतील इतर शिक्षक वृंद यांनी याकामी महत्त्वाचे व मोलाचे सहकार्य केले. इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री अद्वैत जगधने व रेखा रायपूरकर यांनी या सर्व कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन व नियोजन केले होते .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *