सैनिकी प्रशालेत प्रतिनिधी निवडणूक…… शालेय निवडणूक २०१८-१९

दरवर्षीप्रमाणे प्रशालेतील वर्ग प्रतिनिधींची निवड ही शिस्त, आज्ञापालन, सामुहिक जबाबदारीचे तत्व ह्या निवडणुकीच्या महत्वाच्या अंगांनुसार पार पडली. निवडणूक यंत्रणा हे शासन संस्थेचे प्रमुख अंग आहे. प्रशालेतील निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही पद्धतीने उमेदवार, मतदार, मतपेटी, गुप्त मतदान पध्दती, मतपत्रिका, मतदान अधिकारी, निवडणूक निकाल या पध्दतीने पार पडली. इयत्ता ५वी ते १२वी प्रत्येक वर्गानुसार शिस्त मंत्री, अभ्यास मंत्री, स्वच्छता मंत्री या तीन पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेतून विद्यार्थिनींमध्ये नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी मदत होते. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित प्रतिनिधींना त्यांच्या जबाबदारी व कर्तव्य प्रशालेचे कमांडंट कर्नल सारंग काशीकर यांनी स्पष्ट करुन सांगितली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *