शौर्य शिबिराची उत्साहात सुरुवात…….

म. ए. सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली, मुळशी, येथे शौर्य शिबिराची उत्साहात सुरुवात झाली, या शिबिराचे उद्घाटन म. ए. सो. क्रीडावर्धिनी चे महामात्र प्रा. श्री. सुधीर भोसले यांच्या शुभहस्ते झाले. या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, कमांडंट ग्रुप कॅप्टन श्री. विजय कुलकर्णी, उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री श्याम नांगरे. श्री. संदीप पवार , शिबिरप्रमुख श्री. भाऊसाहेब मार्तंड, उपप्रमुख श्री. महेश कोतकर उपस्थित होते. अतिथी मनोगतात प्रा. सुधीर भोसले यांनी या शिबिरातून मुलांमध्ये साहसाची आवड निर्माण करून व्यक्तिमत्त्व विकासासाठी स्वयंशिस्त निर्माण करणे यासाठी घोडेस्वारी,रायफल शूटिंग, धनुर्विद्या, आॅबस्टॅकल , वाॅल क्लांयबिंग, रोप मल्लखांब, इ. साहसी व शिल्पकला, रांगोळी, वारली पेंटिंग, विविध व्यक्तिमत्व विकसन व्याख्याने यांचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगितले, शाळेचे कमांडंट ग्रुप कॅप्टन श्री. विजय कुलकर्णी यांनी ही शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या , या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. सुलभा विधाते यांनी शौर्य शिबिराचे महत्त्व सांगितले, शिबिरातील दिनक्रम सौ. रूपाली लडकत यांनी सांगितला, आभार श्री. साईनाथ जगदाळे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेश कोतकर यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *