विद्याव्रत संस्कार

प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही इयत्ता ८ वी या वर्गातील विद्यार्थिनींवर रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२० या दिवशी विद्याव्रत संस्कार करण्यात आला. त्यापूर्वी विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने विविध व्याख्यानांची रचना करण्यात आली होती. प्रत्येक व्याख्यान सुरू करण्यापूर्वी श्री.भाऊसाहेब मार्तंड यांनी विद्यार्थिनींकडून गीत म्हणून घेतले. सदर व्याख्याने आपल्याच प्रशालेतील विविध शिक्षकांकडून देण्यात आली. ती पुढीलप्रमाणे,

प्रारंभिक व्याख्यान – प्राचार्या मा.डॉ.सुलभा विधाते
बौद्धिक विकसन – पर्यवेक्षक व इतिहास विभाग प्रमुख श्री.श्याम नांगरे
आत्मिक विकसन – भूगोल विभाग प्रमुख श्री.अद्वैत जगधने
शारीरिक विकसन – पर्यवेक्षक व क्रीडा विभाग प्रमुख श्री.संदीप पवार
मानसिक विकसन – विज्ञान विभाग प्रमुख सौ.मंजिरी पाटील
राष्ट्र अर्चना – भूगोल विभाग प्रमुख श्री. अद्वैत जगधने

प्रत्यक्ष विद्याव्रत संस्कार रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२० या दिवशी करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी इयत्ता ८ वी चे पालक, विद्यार्थिनी, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. शुभांगी भालेराव, प्राचार्या मा. डॉ. सुलभा विधाते, कमांडंट ग्रुप कॅप्टन श्री. विजय कुलकर्णी, उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे आणि श्री. संदीप पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे यांनी केले. सूत्रसंचालन इयत्ता ८ वी – अ चे वर्गशिक्षक श्री. गजानन पाटील यांनी केले. सौ. स्नेहा मुदगल व संस्कृत विभाग प्रमुख श्री. साईनाथ जगदाळे यांनी पोथीवाचन केले. पालकांमधून सौ. विद्या भडाळे व श्री. सुभाष वाघ यांनी प्रातिनिधिक स्वरुपात आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनींमधून कु. अहिल्या मोरेपाटील व कु. तनिष्का भोगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर प्रमुख अतिथींनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. श्री. गजानन पाटील यांनी आभार व्यक्त केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमात उपस्थितांना पेढेवाटप करण्यात आले.

कार्यक्रमानंतर उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी यांनी ट्रेक संदर्भात पालकांना सूचना दिल्या. कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेच्या प्राचार्या मा. डॉ. सौ.सुलभा विधाते यांच्या मार्गदर्शनानुसार इयत्ता ८ वी चे वर्गशिक्षक श्री. गजानन पाटील आणि श्रीमती अश्विनी गाभणे यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *