मुळशी कन्या , आंतरराष्ट्रीय योगासन खेळाडू कु.श्रेया कंधारे हिचा सैनिकी शाळेच्या वतीने गौरव

दक्षिण कोरिया येथे झालेल्या नवव्या एशियन योग चॅम्पियनशिप स्पर्धेत मुळशी तालुक्याची सुकन्या व आंतरराष्ट्रीय योगासन खेळाडू कु. श्रेया शंकर कंधारे हिने भारत देशाला सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांच्या हस्ते कु.श्रेयाचा सन्मानचिन्ह,शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच श्रेयाची आई सौ.वर्षा कंधारे यांचा ही सन्मान करण्यात आला याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री.नंदुशेठ भोईर ,श्री.सुभाष शिंदे श्री.महादेव काटे .माण चे माजी उपसरपंच श्री.तानाजी पारखी ,श्री.सूर्यकांत साखरे ,श्री.नितिन विधाते, उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री.शाम नांगरे ,श्री.संदीप पवार हे उपस्थित होते , याप्रसंगी सैनिकी शाळेतील विद्यार्थिनीं प्रतिनिधींना मा.प्राचार्या डॉ.सुलभा विधाते व कु.श्रेया कंधारे यांच्या हस्ते Rank देण्यात आली,यानंतर कु.श्रेया कंधारे हिच्या योगासनांच्या प्रात्यक्षिकाने सर्व विद्यार्थिनींना व पालक व शिक्षकांना मंत्रमुग्ध केले.आपल्या मनोगतात कु्.श्रेया कंधारे हिने आपण ८ते १० तास सराव करीत असल्यानेच तसेच आई वडिलांच्या , शिक्षक, मार्गदर्शक, डॉक्टर यांच्या प्रोत्साहनामुळेच हे यश मिळाल्याचे सांगितले ,प्रास्ताविकात मा.प्राचार्या डॉ.सुलभा विधाते यांनी कु.श्रेया सारखे खेळाडू आपले आदर्श असले पाहिजेत असे सांगितले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख श्री.संदीप पवार व श्री.शाम नांगरे यांनी केले, कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा विभाग प्रमुख श्री.संदीप पवार व सर्व सहकारी शिक्षकांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *