माहेरपण

माजी विद्यार्थी मेळावा दिनांक २८ व २९ डिसेंबर २०२० रोजी सैनिकी शाळेमध्ये उत्साहात पार पडला.सैनिकी शाळा ही एक सक्षम स्त्री घडविणारी आशिया खंडातील पहिली मुलींची सैनिकी शाळाआहे.येत्या काही वर्षात शाळा २५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे . याचे औचित्य साधून माजी विद्यार्थी यांचा मेळावा शाळेमध्ये आयोजित करण्याचे ठरवले. इतर शाळांत प्रमाणे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी या परिसरातच न राहता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहतात या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन शाळेच्या विकासात हातभार लावतील असा प्रयत्न केला गेला.निवासी मेळाव्याचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले. मेळाव्यास एकूण 25 विद्यार्थिनी उपस्थित होत्या. रायफल शूटिंग ,आर्चरी, खेळ ,शेकोटी ,अनुभव कथन, गप्पागोष्टी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन मुलींसाठी केले गेले. भविष्यात शाळेमध्ये आपण काय योगदान करू या विषयी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या निवासी मेळाव्याचे नियोजन शाळेतील शिक्षक श्री. अद्वैत जगधने सर व सौ. अश्विनी मारणे मॅडम यांनी केले त्याचबरोबर शाळेतील सर्व शिक्षकांनी या मेळाव्यास उपस्थिती लावली. मेळाव्याचे औपचारिक उद्घाटन शाळेच्या प्राचार्य डॉक्टर सुलभा विधाते यांनी केले त्याचबरोबर याप्रसंगी शाळेचे कमांडंट ग्रुप कॅप्टन विजय कुलकर्णी हे देखील आवर्जून उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *