महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष 2019- 20 साजरे करताना

दिनांक 19 ऑक्टोबर 2019 रोजी म.ए.सो.राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत दिवाळीनिमित्त भव्य असा आकाश कंदील उभारण्यात आला. सदर आकाश कंदीलाची उंची सहा फूट तर घेर चार फूट आहे. तर टाकाऊ पासून टिकाऊ हे या आकाश कंदिलाचे वैशिष्ट्य सांगता येईल. आकाशकंदीलावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष 2019-20 असा संदेश तयार करण्यात आला आहे.

प्रशालेच्या प्राचार्य डॉक्टर सुलभा विधाते व कमांडंट ग्रुप कॅप्टन विजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यवाही झाली.
सौ. स्नेहा मुदगल, सौ. सुषमा पाटील, श्री. गजानन पाटील, श्री. रविराज थोरात, श्री. साईनाथ जगदाळे, श्री. पोपट कनगरे व श्री. महाले यांच्या कल्पनेतून हा भव्यआकाश कंदील साकारण्यात आला.

सदर कामासाठी प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री. आनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे व श्री. संदीप पवार यांचे मार्गदर्शन लाभले सहकार्य लाभले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *