प्रशालेत पालखी सोहळा संपन्न…..

आषाढी एकादशीचे औचित्य साधून वारीच्या परंपरेची माहिती विद्यार्थिनींना विशेषतः पुढील पिढ्यांना होण्यासाठी प्रशालेत आषाढी
एकादशीच्या आधी वारीचे आयोजन केले गेले. यामध्ये इयत्ता ५ वी तील साया साळवे-विठ्ठल, संस्कृती गिरासे-रखुमाई आणि सर्व विद्यार्थिनी वारकरी म्हणून सहभागी झाल्या.

वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्त्वाचे स्थान आहे. हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंग रचना याचे
गायन वृंदा गांजुरे, समृद्धी साखरे या विद्यार्थिनींनी केले तसेच वैभवी इंगवले, केतकी घोडके, तेजस्वीनी बांदल, रिया देशपांडे या विद्यार्थिनींनी
विठ्ठलाचे गुणगान करणारी गीते सादर केली. या कार्यक्रमास इयत्ता ५ वी वर्गशिक्षक श्रीमती सविता हिले, श्रीमती प्रमिला महाले यांनी मार्गदर्शन
केले. तसेच कमांडंट श्री. सारंग काशीकर आणि मुख्याध्यापिका पूजा जोग यांचे सहकार्य लाभले. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या
विठूमाऊलीच्या आनंद सोहळ्यात तल्लीन होण्याचा अनुभव सैनिकी परिवाराने घेतला. टाळ-मृदुंगाच्या गजरात गणपती आणि विठ्ठलाच्या
आरतीने सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *