थोर सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.विजय फळणीकर यांचा सैनिकी शाळेच्या वतीने गौरव

सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल थोर सामाजिक कार्यकर्ते, लेखक व “आपलं घर ” संस्थेचे संस्थापक मा. श्री.विजय फळणीकर यांचा म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सौ. साधना फळणीकर यांचा ही सन्मान करण्यात आला याप्रसंगी श्रीमती अरुणा देशमुख, श्रीमती प्रतिभा भट, श्री.नितीन विधाते, उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. शाम नांगरे, श्री.संदीप पवार हे उपस्थित होते. आपल्या मनोगतात श्री. विजय फळणीकर यांनी सांगितले की घरची परिस्थिती खूपच प्रतिकुल असल्याने संघर्ष करावा लागला व या संघर्षातून च आपल्याला माणुस म्हणून जगण्याची प्रेरणा मिळाली व त्यामुळे च आपलं घर च्या माध्यमातून समाजाच्या सुख – दुखाशी एकरुप होता आले प्रास्ताविकात मा.प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी असे सांगितले की मा. श्री. विजय फळणीकरांचे कार्य म्हणजे एखाद्या दीपस्तंभासारखेच आदर्शवत आहे. या प्रसंगी लेखक मा. श्री. विजय फळणीकर यांनी शाळेला सामाजिक जाणीवा जागृत करणारी अशी प्रेरणादायी स्वयंलिखित पुस्तके शाळेला भेट दिली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती दिपाली आंबेकर यांनी केले, आभार श्री. अनंत कुलकर्णी यांनी मानले, या कार्यक्रमाचे आयोजन ‘गोडबोले ट्रस्टच्या’ अंतर्गत समन्वयक श्री. अद्वैत जगधने व पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *