जिल्हास्तरीय बाल विज्ञान मेळावा: प्रथम क्रमांक

राज्य विज्ञान संस्था, नागपूर व पुणे जिल्हा परिषद (माध्यमिक शिक्षण विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय बाल विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त ८वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांनी औद्योगिक क्रांती ४.० (Industrial Revolution 4.0) या विषयावर आधारित सादरीकरण केले. यासाठी स्वतः तयार केलेली भित्तीपत्रके (Posters) व पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा वापर करण्यात आला.

सदर स्पर्धेसाठी आपल्या प्रशालेतील इयत्ता १०वी तील विद्यार्थिनी कु. नेहा पाटील या विद्यार्थिनीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक
मिळविला व तिची निवड राज्य स्तरासाठी करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *