गणेश विसर्जनात विरांगनांचे चित्त थरारक रोप मल्लखांब प्रात्यक्षिके

‘कसबा पेठ गणपती’, पुण्याचा मानाचा पहिला गणपती. याच्या गणेश विसर्जनात आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची ‘राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार-आंबोली’, या प्रशालेतील मुलींनी रोप मल्लखांबाचे चित्त थरारक प्रात्यक्षिके पुण्यातील लाखो लोकांसमोर सादर केली. सदर मिरवणुकीत पुण्याचे खासदार मा. गिरीशजी बापट, तसेच पुणे महानगर पालिकेचे महापौर मा. मुक्ता टिळक, माजी विद्यार्थिनी व कसबा पेठ नगरसेविका सौ. गायत्री खडके यांनी भेट दिली. तसेच या मिरवणुकीत संस्थेचे नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीवजी सहस्त्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट, नियामक मंडळाचे सदस्य व शालासमिती सदस्य श्री बाबासाहेब शिंदे, प्रशालेच्या शाला समिती अध्यक्षा डॉ. माधवीताई मेहेंदळे, शाला समिती महामात्रा डॉ. मानसी भाटे तसेच प्रशालेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते , प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, व श्री. संदीप पवार, तसेच प्रशालेतील शिक्षकगण व पालक उपस्थित होते. नियामक मंडळ सदस्य ऍडव्होकेट नेवसे सर यांचे महत्वाचे सहकार्य लाभले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *