ऍडमिरल (निवृत्त) विष्णू भागवत यांनी प्रशालेस् सदिच्छा भेट……

ऍडमिरल (निवृत्त) विष्णू भागवत यांनी प्रशालेस् सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमासाठी कमांडंट कर्नल श्री. सारंग काशीकर आणि प्राचार्या सौ.पूजा जोग उपस्थित होते. ऍडमिरल विष्णू भागवत पीव्हीएसएम, एव्हीएसएम या पदकांनी गौरविण्यात आले आहे. भारताचे नौसेना प्रमुख म्हणून व एक प्रतिभावान आणि ऑल-राउंड ऑफिसर म्हणून भारतीय नौदलातील एक उत्कृष्ट कारकीर्द त्यांनी गाजवली.

प्रशालेतील इयत्ता ९वी ते १२वी च्या विद्यार्थिनींशी ऍडमिरल (निवृत्त) विष्णू भागवत यांनी सुसंवाद साधला. निर्भय, पराक्रमी, तेजस्वी, प्रत्यक्ष भवानीचे रूप
असणार्‍या राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांच्या मनात धास्ती निर्माण केली होती तसेच १८५७ च्या उठावातील राणीने केलेल्या नेतृत्वाविषयी सांगितले. प्लासीची लढाई व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे विस्तारवादी धोरण या इतिहासाविषयी माहिती दिली.

ऍडमिरल विष्णू भागवत सांगतात की, “जेव्हा सर्व शेतक-यांचे अश्रु पुसले जातील तेव्हा भारत सार्वभौम होईल.” त्यानंतर जय हिंद असे म्हणत विद्यार्थिनींना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन श्री. महेश कोतकर यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *