Water Sports in RLMSS

मनोगत ………………
“प्रत्येक वडिलांना अभिमान असतो तो त्याच्या मुलांचा.
आणि खास करून मुली असतील तर मग काय वडिलांच्या तोंडात तीळ भिजणे पण शक्य नाही!
माझ्या दोन लेकी “राणी लक्ष्मी बाई सैनिकी “शाळेत प्रशिक्षण घेत आहेत .माझ्या साठी खूप अभिमानाची बाब आहे .
आणि निश्चितच माझ्या लेकी,
ह्या माझ्या अभिमानाचा सर्वोच्य बिंदू आहेत.
ओघानेच त्या शिकत असलेल्या शाळेशी माझी देखील एक पालक म्हणून नकळत नाळ जोडली गेली .
पहिल्यांदा पालक म्हणून ,
मग वर्गाचा प्रतिनिधी म्हणून ,
नंतर पालक शिक्षक संघाचा प्रतिनिधी म्हणून अश्या वेग वेगळ्या कारणाने सतत शाळा परिवार जवळून बघण्याची संधी मिळत होती. का कोणास ठाऊक पण एक वेगळीच “भावना” आणि एक” उत्तम स्पिरिट” तयार होत होतं.६०० पेक्षा अधिक निवासी कन्या सांभाळताना काय त्रेधा तिरपिट उडत असेल ,याची कल्पना आपल्याला घरातल्या
एक ,दोन ,किंवा फार तर तीन लेकी सांभाळताना नक्कीच येते .
मग अनेक
गोष्टी “पुढे- मागे” होतात ,
“वर- खाली” होतात,
“कमी- जास्त” होतात,
मग ह्यांच चुकलं !,त्यांचं बरोबर! ,
मी थांबतो! . – मी करतो! .
कास शक्य आहे? – करूनच टाकू!
अश्या अनेक गोष्टी, प्रश्न वाचक चिन्ह?, आणि
उद्गार वाचक दंड ! ,अनेकांना कडून वेग वेगळ्या पद्धतीने येतात.
कोणी सौम्य पणे मांडतात ,
कोणी आकांड तांडव करून ,
कोणी तोंडी सांगून टाकतात ,
तर कोणी लेखी,
कोणी मूक संमती ,
तर कोणी तिसरी आघाडी !!!!!!!!!!!
हे सगळं होणारच कारण हा परिवार आहे आणि याच्या शिवाय परिवार होऊच शकत नाही .आणखीन एक महत्वाची गोष्ट जी स्पष्ट करते की हा परिवार आहे ते म्हणजे यातील “मुली ” !!!!वरील “सगळ्या” गोष्टी करणारे सगळे जण “मुली ” म्हंटले की “सगळे सोडून” कंबर कसून एकत्र येतात.
रस्ते सगळ्यांचे वेग वेगळे असले तरी ध्येय मात्र एकच ,
शाळेतील “मुली” ! आणि मग मात्र वरती
“सगळे काही ” करणारे सगळे -” सगळं काही”
सोडून मुलींसाठी काम करायला लागतात.
याचा उत्तम अनुभव आज २९.०४.२०१८.रोजी संपूर्ण दिवस भर मी स्वतः घेतला .निमित्त होते मुलींन साठी नवीन आव्हानात्मक ऍक्टिव्हिटी देऊन ,शाळेतील” सैनिकी रंग गडद” करण्याचा प्रयन्त करणे.
आदल्या दिवशी मीटिंग असल्याने कमांडन्ट सरांची भेट झाली आणि त्यांनी सांगितले .
“उणेचा सर !!!,
कल आजावो पौड मे ,
बच्ची ओके लिये कुछ बनाना है
हेल्प लगेगी हम लोग छे साडे छे बजे तक पहूच जायेंगे !”
मग काय आमचा मोर्चा सकाळी सात ला डायरेक्ट पौड !
पाट बंधारे खात्याचा ऑफिस जवळ नदीवर एक छोटा बंधारा आहे .तिथे सातला गेल्यावर
नदी बघून परत यायच आहे ,
की मी पोहचलो तुम्ही कुठे आहात ?असे फोन कारायचे ,
का चहा पिऊन परत निघायचे ? अश्या विचारात पोहचतो तोवर एक “अदृश्य आवाज” कानावर आला
याsssss उणेचा सर !!!!!!!
हो “अदृश्य आवाज” आणि तो ही कुलकर्णी सरांचा !
कारण उपमुख्यध्यापक कुलकर्णी सर दोरी बांधण्या साठी शिडी लावून जांभळाच्या झाडावर चढुन बसले होते.
वरून त्यांना मी दिसलो पण मला काही ते दिसले नाही .
पण तेव्हा तो आखा परिवार ,ती भावना ,ती पोरींची काळजी मात्र संपूर्ण पणे आणि स्पष्ट दिसली.एक वेगळच स्फुरण चढल मला
आणि मग मी पण त्या रंगात रंगून गेलो दिवस भर .
काशीकर सर,कुलकर्णी सर,जोशी सर,माळी सर,महाले मॅडम,सोळंकी मॅडम,गुरव सर ,जाधव सर ,
मनस्वी,आर्या,स्नेहा अशी वानर सेना आणि मी कामाला लागलो ,
मुलींना नदी क्रॉस करण्याचा अनुभव देण्या साठी रोप लावण्या पासून सुरवात झाली ,मग या झाडावरून त्या झाडावर ,
ओढा ओढी ,फुल्ल ताकत लावून मॅडम सहित सगळ्यांनीच
वन sssssss
टू sssssssssssssss
थ्री sssssssssssss ssss
उप
म्हणून ओढणे .
माळी सरांनी बांधलेली ती भक्कम गाठ.
जोशी सरांची बंधाऱ्या पासून झाडा पर्यंतची धावपळ.
मॅडमच काय लागतंय – काय नाही ते देणे .
बच्चे कंपनी ने केलीली सामानाची वाहतुक .
कुलकर्णी सरांनि आधीच
यथा योग्य “मंत्र श्लोक” म्हणून सगळ्या देवांचा घेतलेला “ताबा”
आणि
या सगळ्यावर “वडिलांच्या भावनेने” असलेलं कर्नल सरांच लक्ष.
अवघ्या काही तासाताच दोर लावून
“रिव्हर क्रॉससिंग “ची ऍक्टिव्हिटी करायला सगळे सज्ज .
पण त्या आधी हे सगळे आपल्या लेकीं साठी आहे म्हणून काशीकर सरानी स्वतः कपड्याची परवा न करता पाण्यात उतरून त्याची चाचणी केली .आणि मग सुरक्षिततेच्या दृष्टीने दोर डबल करून शिवाय आणखीन एक लाईफ लाईन ऍड करण्यात आली.
“हा ssssss
अब ये ठीक है ”
त्यांचे सैन्यातील हिंदी शब्द सगळ्यांच्या कानावर पडले .
मग काय “महाले मॅडम “पासून ते “वानर सेने” पर्यंत सगळ्यांची चाचणी झाली .आणि सगळ्यांनी ती आनंदाने केली बंधाऱ्या वरून दोरीच्या साह्याने पाण्यात उतरताना थेट कडेलोटचाच अनुभव ,मग अर्धे पाण्यात ,अर्धे लटकत स्वतः ला ओढत पैल तीरी नेण्याची मजा,
,”ताकत” आणि “धैर्य “पणाला लावत होती.
पण जिथे वडीलधारी माणसे स्वतः येऊन करून शिकवतात ना तिथे “प्रगती” ला दुसरा पर्यायच राहत नाही .
अहो संस्थेतील पदाधिकारी स्वतः तिथे हजर राहून निर्धास्त पणे जेव्हा ऍक्टिव्हिटी करतात तेव्हा ते शिक्षकांनी केलेल्या कामावर “दृढ विश्वासाची थाप “देतात .
आपटे सरांनी स्वतः ती ऍक्टिव्हिटी करून ते सिद्ध केले .खरोखर खूप छान आणि अभिमान वाटत होता.
त्या सगळयाना पाहुन,
तिथे राहून
त्या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होऊन ,
मग काय पुन्हा सगळे कामाला लागलो मुलींसाठी एक मस्त “राफ्ट” बनवला त्यावर मुलीना नीट “राफ्टिंग” करता यावे या करीता पवार सरान सोबत सगळ्यांनी त्याची चाचणी घेतली ते तोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्या साठी “मी आणि माळी सर”
तर अक्षरशः नाचलो पण काही झाले नाही .
“एक दम मस्त हो गया अभि “sssssss !!!!!!!
चार्ज सैनिकी हिंदी शब्द कानावर आले की पुढचे काय? असं विचारायचं .पण आता काही नाही पाहिले जेवून घ्या .
मग “अन्नदाते “म्हणून सकाळी प्रगटलेले गुंड सर पुन्हा हजर. सकाळच्या “उपम्याचीच ” चव अजून तोंडत होती जेवणाची वेळ होऊन गेली तरी जेवण कडे माझं फारस लक्ष न्हवत.
कारण या सगळ्यांच्या
कष्टाची ,
प्रेमाची ,
आदरची ,
काळजीची आणि
काहीतरी करण्याची
चव अजूनही डोळ्या पुढे रेंगाळत होती .
सगळं तयार होतं. मुली आल्या आणि प्रत्येक्षात त्यांची ऍक्टिव्हिटी सुरू झाली .आपला रोल संपला होता ,जायची वेळ झाली होती .सगळ्यांच आप-आपले रोल समपवून जावे लागणार आहे .जपावे लागणार ते केवळ “साक्षी भावाने” घेतलेलं हे अनुभव जे आयुष्यभर साथ देतील .!!!!!! त्याचाच हा छोटासा प्रयत्न !!!!!!!!!!!!

———————————————————————
शंकर उणेचा
पालक प्रतिनिधी .
यशश्री उणेचा आठवी अ
फाल्गुनी उणेचा सहावी ब
२९.०४.२०१८

कॅमेऱ्यात टिपलेले काही क्षण …………