Principal's Desk

Education plays an important role in the progress of a nation- especially women's education. Women of our nation have aspirations to contribute to nation building and imbibe the virtues and qualities of patriotism, integrity and leadership.

Empowering the women of our country to achieve these dreams is at the centre of the school's ambition. Maharashtra Education Society has imparted quality education to thousands of students over more than 150 years of its existence and is a pioneer in starting the first girls’ sainik school in the country.

The honed and skilled students of the school not only feed into the defence wing of India but also strengthen its resolve of protecting our country. We recognize that our partnership with government, NGOs and the civil society has been central to our success over the last 18 years and I offer my deep gratitude to the stakeholders including the parents and the students.

I look forward to contributing to the glorious future of India by developing its leaders of tomorrow together with my colleagues and the staff at the school.

Mrs. Pooja Jog
Mrs. Pooja Jog
Principal

 

 

Testimonial

August 4, 2017

काल आपल्या माधवीताई मेहेंदळे अध्यक्ष असलेल्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत ग्रीन स्कॉलरशिप आणि पुरस्कार वितरणासाठी गेलो होतो. एक समृद्ध अनुभव यावेळी घेता आला. आपण महिला सशक्तीकरणा बद्दल खूप बोलतो पण जेव्हा प्रत्यक्ष कृती करणाऱ्या अशा संस्था पाहायला मिळतात तेव्हा ऊर अभिमानाने भरून येतो.महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची फक्त मुलींसाठी सैनिकी प्रशिक्षण देणारी निवासी स्वरूपाची ही देशातली पहिली शाळा. आजघडीला येथे तब्बल 700 मुली सैनिकी प्रशिक्षण घेत आहेत. 5वी ते 12वी अशी ही शाळा आहे. 30 एकराचा विस्तीर्ण परिसर, निसर्गाचं वरदान लाभलेला सुंदर परिसर, प्रेमात पडावं असं इमारतींच बांधकाम, नजरेत भरणारी स्वच्छता , नीटनेटकेपणा असं सारंच नयनरम्य आहे. या सौंदर्यात खरी भर घातली आहे ती इथं शिकणाऱ्या मुलींनी. सळसळत्या उत्साहाने आणि ध्येयवादी विचारांनी भारावलेल्या या किशोरवयीन मुली आपल्याला पण ऊर्जा देऊन जातात. त्यांची करडी शिस्त पाहून आपणही अंतर्मुख होतो. पर्यावरणाचा हात हातात धरून पर्यावरण रक्षणासह विकास कसा केला जावा याचे ही शाळा उत्तम मॉडेल आहे. विशेष म्हणजे प्रत्येक गोष्ट इथं मुलींच्या सहभागातून होते. त्यांचा श्रमाला आणि कौशल्याला इथं पूर्ण वाव आहे.  अभ्यासाबरोबरच इथं घोडेस्वारी, कराटे, मल्लखांब आणि इतर खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. सैन्य दलातील निवृत्त अधिकारी ही जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. इथून शिकून बाहेर पडलेल्या कितीतरी मुली आज भारतीय सैन्य दलात मोठमोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत.
मुळात ही संस्था वेगळी वाट चोखाळणारी आहे. पारंपरिक शिक्षणाहुन वेगळे शिक्षण देणारी आहे.  त्यामुळे अशा संस्थेचा डोलारा सांभाळणं ही कठीण बाब आहे. वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीतून आलेल्या मुलींना एका धाग्यात बांधण्याचे हे कठीण कर्म आहे. पण माधवीताई आणि त्यांची टीम ही जबाबदारी नेटाने पेलत आहेत. येणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा सामना करत पुढे जात आहेत. प्रश्न अनेक आहेत पण त्याला भिडण्याची तयारी पण आहे, ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते.
शहरातील सिमेंटच्या जंगलातील कोंडवाडा वाटावा अशा शाळा पाहिल्या की इथं शिकणाऱ्या मुलींचा हेवा वाटतो. अशा शाळा ही खऱ्या अर्थाने कुठल्याही समाजाची खरी गरज असते. निसर्गाच्या सानिध्यात राहून जीवनाशी भिडण्याचे हे प्रशिक्षण खऱ्या अर्थाने महिला सशक्तीकरणाचा वस्तुपाठ आहे. शक्य असेल त्यांनी या शाळेला नक्की भेट द्यावी, तिथले अभिनव उपक्रम समजून घ्यावेत. इथलं व्यवस्थापन हा देखील अभ्यासाचा विषय होऊ शकतो इतकं ते परिपूर्ण आहे. माधवीताई एक निष्णात डॉक्टर म्हणून परिचित होत्याच पण त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा एक नवा पैलू या निमित्ताने पाहता आला. त्यांच्या या कार्याचा सदैव अभिमान वाटत राहील.

श्री. किरण केंद्रे
श्री. किरण केंद्रे
सम्पादक ,किशोर, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ ,बालभारती पुणे

 

 

Our Achievers

JoomShaper